Powered By Blogger

Tuesday, May 10, 2011

खरे बोलण्याचा फायदा




खरे बोलण्याचा एक फायदा असतो
काय बोललो ते लक्षात ठेवावे लागत नाही









शांतिलाल सुरतवाला ,पुणे
ईमेल- shantitalsurtwala@yahoo.com
Mob- 09422003333

Monday, May 9, 2011

आर.बी.आय.ने अहवाल उघड करावा


महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या गैर कारभार अत्ता उघड झाला आहे. आर बी आय नी नाबाडला प्रशासक म्हणुन नेमले आहे . आता आर.बी.आय.ने य़ा बँकेच्या कारभारा बद्दलचा अहवाल जनतेसाठी उघड करावा , असे मला वाटते.
य़ा प्रश्नाबाबत कुणी काय केले त्याचे पितळ बाहेर येइल .राजकीय नेत्यांनी कितीही शाब्दिक चर्चा केली, एकमेकांचे दावे खोडून काढले तरी त्यातून काय निष्पन्न होणार ?
अहवाल जनतेसाठी उघड झाल्याने ५४ संचालकांनी काय केले , किती , कुणाला कर्जे दिली ते सारे समजेल .
याबाबत राजकीय नेत्यांनी वेगवेगळी मते प्रकट करून महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करू नये.

- शांतिलाल सुरतवाला
ईमेल- shantilalsuratwala@yahoo.com

http://articles.timesofindia.indiatimes.com/2011-05-08/nagpur/29522489_1_mscb-dccbs-cooperative-banks

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8201986.cms

http://www.youtube.com/watch?v=3OoC9CIpGgM

जैतापूरला राजकीय विरोध नको



महाराष्ट्र राज्याचे जे नुकसान होते आहे त्याला आपण सर्वचजण जबाबदार आहोत. एनरॉन समुद्रात बुडवून आपले अधीच नुकसान झाले आहे. आता तरी जैतापूर प्रकल्पाबाबत राजरकारण होते आहे. यामुळे राज्याचेच नुकसान होणार आहे. ते पाप राजकारण्यांनी आपल्या माथी मारून घेऊ नये.
मला असे वाटते की, यात राजकीय व्यक्तिंनी येवू नये. त्या क्षेत्रातल्या तज्ञ व्याक्तिंनी ( अनिल काकोकडरांसारखे)
एकत्रीत बसून सांगावे आणि ते महाराष्ट्राने ऐकावे. त्याला मग विरोध कोणत्याच स्तरावरून होउ नये.
पुढच्या पिढीने आपल्याला क्षमा करू नये असे राजकीय व्याक्तिंनी वागू नये. आपण काय आज सत्तेवर आहोत. उद्या नसणार हे लक्षात घ्यावे. पण त्यामुळे राज्याचे नुकसान होणार आहे, हे ध्यानी घ्यावे.
समाजाला मिळणारे फायदे यापुढेही समाजहित गृहित धरून मिळावेत हेच माझे मत आहे.
तुम्ही तुमच्या गरजा कमी करा...हा महात्मा गांधी यांचा रस्ता सोडला तेव्हाच तुम्ही विनाशाचा रस्ता पकडला, हे सिध्द झाले आहे. गरजा वाढवून आपणच आपल्या पायावर धोंडा मारून घेतला आहे....


माझे मत असे आहे....
आता जे मनात येईल. रुचेल.. व मनाला योग्य वाटेल..ते लिहित राहीन.
पुण्याचे पत्रकार व माझे मित्र सुभाष इनामदारांच्या सहकार्य़ाने हा लेखनाचा प्रपंच मांडला आहे...तो गोड मानून..त्यावर तुम्ही बोलते व्हावे..हिच माझी मनापासूनची इच्छा...


आपला,

शांतिलाल सुरतवाला
पुणे.
मोबा.09422003333
मेल- shantilalsurtwala@yahoo.com

शांतिलाल सुरतवाला


राष्ट्रसेवेत तडजोड नाही,,, हे ब्रिद घेउन कार्य करणारे एक निष्ठावान समाजसेवक.


खरे म्हणाल तर पुण्यात त्यांना काका म्हणूनच ओळखले जाते.
सध्या ते महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यश्र असले तरी त्यांची पुण्याला ओळख म्हणजे
माजी महापौर (१९९२-९३ )या नात्याने.
पुणे महापालिकेचे नगरसेवक म्हणून पुणेकरांची व पर्यायाने नागरीकांचे प्रश्न तडीस नेले ते १९७९ – २००७ मध्ये.
आचार्य आनंदऋषीची पुणे ब्लड बॅंकेचे ते संस्थापक.
पुणे वाचन मंदिर ,सह्याद्री ट्रस्टचे विश्वस्त आणि पुणे ट्रेकर्स य़ा संस्थेचे अध्यक्ष

राजकीय क्षेत्रात ३० वर्षे राहूनही आपले छंद जपत
जिथे खुपते तिथे स्पष्ट बोलणारा हा सामाजिक कार्यकर्ता.

आज या ब्लॉगच्या माध्यमातून जे दिसते, जसे खुपते तिथे बोलायला सिध्द झाले आहेत. त्यांचा परिचय यातूनच होईलच...
त्यांच्या या विचारांवर तुम्हाला जर काही प्रतिक्रिया जरूर कळवा...
काही शंका असल्या तर जरूर कळवा...
काही अडचणी जाणवल्या तर खुशाल कळवा..अगदी बिनधास्त....
त्यांचा मेल आहे
Mail- shantilalsuratwala@yahoo.com

about me please see thsi link



http://www.punediary.com/html/kaka.html