
महाराष्ट्र राज्याचे जे नुकसान होते आहे त्याला आपण सर्वचजण जबाबदार आहोत. एनरॉन समुद्रात बुडवून आपले अधीच नुकसान झाले आहे. आता तरी जैतापूर प्रकल्पाबाबत राजरकारण होते आहे. यामुळे राज्याचेच नुकसान होणार आहे. ते पाप राजकारण्यांनी आपल्या माथी मारून घेऊ नये.
मला असे वाटते की, यात राजकीय व्यक्तिंनी येवू नये. त्या क्षेत्रातल्या तज्ञ व्याक्तिंनी ( अनिल काकोकडरांसारखे)
एकत्रीत बसून सांगावे आणि ते महाराष्ट्राने ऐकावे. त्याला मग विरोध कोणत्याच स्तरावरून होउ नये.
पुढच्या पिढीने आपल्याला क्षमा करू नये असे राजकीय व्याक्तिंनी वागू नये. आपण काय आज सत्तेवर आहोत. उद्या नसणार हे लक्षात घ्यावे. पण त्यामुळे राज्याचे नुकसान होणार आहे, हे ध्यानी घ्यावे.
समाजाला मिळणारे फायदे यापुढेही समाजहित गृहित धरून मिळावेत हेच माझे मत आहे.
तुम्ही तुमच्या गरजा कमी करा...हा महात्मा गांधी यांचा रस्ता सोडला तेव्हाच तुम्ही विनाशाचा रस्ता पकडला, हे सिध्द झाले आहे. गरजा वाढवून आपणच आपल्या पायावर धोंडा मारून घेतला आहे....
माझे मत असे आहे....
आता जे मनात येईल. रुचेल.. व मनाला योग्य वाटेल..ते लिहित राहीन.
पुण्याचे पत्रकार व माझे मित्र सुभाष इनामदारांच्या सहकार्य़ाने हा लेखनाचा प्रपंच मांडला आहे...तो गोड मानून..त्यावर तुम्ही बोलते व्हावे..हिच माझी मनापासूनची इच्छा...
आपला,
शांतिलाल सुरतवाला
पुणे.
मोबा.09422003333
मेल- shantilalsurtwala@yahoo.com

No comments:
Post a Comment